गणेश उत्सवाच्या पार्श्व भूमीवर सुरक्षा आणि कायदा विषयक झाली सकारात्मक चर्चा.
प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
खोपोली पोलिस ठाणे हद्दीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी महाराष्ट्र शासनाने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी केले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची, शांतता समिती सदस्य, मोहल्ला कमिटि सदस्य, समन्वय समिति सदस्य, पत्रकार वा सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी यांची संयुक्तिक सभा पोलीस ठाण्याच्या सभागृहात पार पडली. या वेळी मा.नगराध्यक्षा सुमन औसरमल,उपनगराध्यक्ष विनिता कांबळे, महावितरणचे अधिकारी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.
१० सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होत आहे. या वेळी सर्वांनी आपली व समाजाची काळजी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन केले.सार्वजनिक गणेशोत्सवासाठी खोपोली पोलीस तसेच खालापूर तहसीलदारांची परवानगी बंधनकारक राहील. दर्शनाला येणाऱ्यांची भाविक भक्तांची लेखी नोंद करून येथे मंडपात सॅनिटायझर ठेवावे. गणेश मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही.
उत्सवात कमीत कमी खर्च करावा. मंडळांकडून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात यावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. त्याच सोबत साधकबाधक चर्चा व विचार विनिमय झाला. सर्वांनी पोलीस यंत्रणेकडून निर्देशित केलेल्या सूचनां मान्य करत योग्य सहकार्य करण्याचा संकल्प केला.