खोपोलीत सामाजिक कार्यकर्ता कांचन जाधव यांची दुचाकी अज्ञातांनी सूडबुद्धीने जाळली..

0
64

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खोपोली शहरात सूडबुद्धीने सोमजाई वाडी येथे सामजिक कार्यकर्त्या व महिला  उद्योजक यांची दुकान समोर उभी केलेली स्कुटी अज्ञात समाजकंठकांनी जाळून टाकल्याची घटना पहाटेच्या दरम्यान घडली असून सदरची घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाल्याने या घटनेतील आरोपी लवकरच पोलिसांच्या हाताला लागतील असा विश्वास खोपोली पोलिसांनी वर्तविला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की खोपोली शहरात सामाजिक कार्यकर्ता व उद्योजिका कांचन जाधव यांचे मसाला व किराणा मालाचे घाऊक दुकान सोमजाईवाडी येथे आहे या ठिकाणी  6 जून रोजी दुकानासमोर त्यांची लाल रंगाची स्कुटी उभी केली होती जाधव या काटरंग  भागात वास्तव्य करीत असल्याने दुकानात कोणी नसल्याचा फायदा घेऊन सूडबुद्धीने नुकसान करण्याचा हेतूने अज्ञात समाजकंठकांनी पहाटे 3 : 30 वाजण्याच्या दरम्यान त्याची स्कुटी दुकांसमोरून आणून समोर असणाऱ्या रस्त्यावर आणून पेटवून दिली.

सदरची बाब गस्ती साठी असणाऱ्या पोलिसांना माहिती मिळाल्याने घटनास्थळी जाऊन पाहिले असता स्कुटी जळून खाक झाली होती चौकशी अंती ही स्कुटी सामजिक कार्यकर्ता कांचन जाधव यांची असल्याची माहिती मिळाल्याने सदरची माहिती त्यांना दिल्याने तात्काळ याबाबत खोपोली पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी सदरची घटना सी सी टीव्ही मध्ये कैद झाल्याचे सांगून लवकरच आरोपी हाती लागतील असा विश्वास पोलिसांनी वर्तविला आहे या घटनेचा तपास पो ना कुंभार पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला आहे