प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
शनिवारी सकाळी खोपोली जवळील साजगांव ग्रामपंचायत हद्दीतील एका विहिरीत इसमाचा मृतदेह आढळून आला .सदर मृत्यू देह खोपोली पोलिसांच्या उपस्थितीत अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी ग्रुपच्या सदस्यांनी बाहेर काढला.
सदर मृत्यू देह याच परिसरातील रहिवासी सुनिल देशमुख वय 44 या व्यक्तीचा असून, मृत्यू देहाला बांधलेले वजन वन्य स्थिती बघता, ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तरीही खोपोली पोलीस या संदर्भात सखोल तपास करीत आहेत.