Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली जुन्या मुंबई पुणे हाय वे वर , ट्रक पलटी ...

खोपोली जुन्या मुंबई पुणे हाय वे वर , ट्रक पलटी चालक गंभीर जखमी..

(खालापूर दत्तात्रय शेडगे)
खोपोली दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास खोपोलीत शिळफाटा येथे अपघात झाला असून पुण्याकडून मुंबई कडे जाणारा एक ट्रक तीव्र उतारावर व वळणावर रस्त्याच्या कडेला पलटी झाला यात ट्रक चा चालक गंभीररीत्या जखमी झाल्याचे समजते.


बेंगलोर हून ट्रक मध्ये माल घेऊन कर्नाटकातील धारवाड चा सय्यद होरणल्ली हा चालक मुंबई पुणे महामार्गावरून खोपोली एक्झिट ने उतरत पुढे निघाला होता, खोपोली शहरातील शिळफाटा पर्यन्त हा मार्ग डोंगरातून येतो व तीव्र उताराचा आहे.

त्यामुळे कदाचित त्याला रस्त्याच्या वळणाचा व उताराचा अंदाज आला नसावा व त्याची ट्रक शिळफाट्यावरील पटेल नगर च्या वरती रस्त्याच्या कडेला पलटी झाला आणि अपघात झाला. या अपघातात चालक सय्यद हा जबर जखमी झाला.

प्रथम दर्शनी तो यात वाचला नसेल असा अंदाज बांधण्यात आला पन अपघात ग्रासतांच्या मदतीला टिम चे सदस्य तेथे पोहचले त्या जखमी चालकास खोपोलीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा त्याच्या डोक्याला जखम झाली होती व डावा पायाचे हाड मोडले असल्याचे डॉक्टरांनी संगितले.सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisment -