Tuesday, September 26, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली बोरघाटात टेम्पोचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात..

खोपोली बोरघाटात टेम्पोचा अपघात, चालकाचा ताबा सुटल्याने झाला अपघात..

(प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे)
खोपोली बोरघाटात आज सकाळच्या सुमारास टेम्पोचा अपघात झाला आहे.

टेम्पोचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजते. पुणे भोसरी येथील महादेव हक्के असे चालकाचे नाव आहे. तो टेम्पो क्र.एमएच १२ केपी ०८१२ हा घेऊन पुण्याहून मुंबईकडे जुन्या मुंबई पुणे मार्गाने बोरघाटातून येत असताना हा अपघात झाला. यात वाहनाचा क्लिनर सुखरूप आहे.

तर चालक अपघातानंतर वाहनात अडकून पडला होता. त्यावेळी अपघाताची माहिती मिळताच आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, अपघातग्रस्तांचा मदतीसाठी टीम आदीनी अथक प्रयत्न करत चालकाला बाहेर काढून त्याला खोपोली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

- Advertisment -