Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाखोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोलेरो पिकअप उलटली, १५ जखमी..

खोपोली: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोलेरो पिकअप उलटली, १५ जखमी..

खोपोली: आज २८ जून रोजी सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक बोलेरो पिकअप (MH 06 BV 6061) चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात टेम्पोमध्ये सवार १५ प्रवासी जखमी झाले आहेत. पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर किलोमीटर ४४/५०० जवळ हा अपघात झाला.
प्राप्त माहितीनुसार, पिकअप टेम्पोमध्ये २५ ते ३० प्रवासी बसले होते, ज्यातील १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना आयआरबी आणि लोकमान्य हॉस्पिटलच्या अॅम्बुलन्सच्या सहाय्याने खोपोली नगर पालिका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
दुर्घटनाग्रस्त बोलेरो पिकअपला क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. आयआरबी पेट्रोलिंग, डेल्टा फोर्स, आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाने तात्काळ मदतकार्य केले. महामार्ग वाहतूक पोलीस बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तत्काळ पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रित केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page