Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली येथील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत क्षितिजा मरागजे हिला सुवर्ण तर सई...

खोपोली येथील राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत क्षितिजा मरागजे हिला सुवर्ण तर सई शिर्के हिला रोप्य पदक…

खोपोली (प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा 2022-23 चे भव्य आयोजन जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने खोपोली येथील नियोजित कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार क्रीडा नगरी येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर असे 8 विभाग आणि 1 क्रीडा प्रबोधिनी मिळून 161अव्वल महिला कुस्तीगीरांनी आपल्या दर्जेदार खेळाचे प्रदर्शन केले.या स्पर्धेत मुंबई विभागाची खेळाडू आणि कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल खोपोलीची विद्यार्थिनी कुमारी क्षितिजा जगदिश मरागजे ही 14 वर्ष वयोगट आणि 39 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदकाची मानकरी ठरली. या यशामुळे क्षितिजाची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.तर मुंबई विभागाची कुमारी सई संजय शिर्के हिने 17 वर्ष वयोगटात 40 किलोगटात रोप्यपदक प्राप्त केले आहे.
क्षितिजा आणि सई यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील, केटीएसपी चे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाहक किशोर पाटील , शिवछत्रपती पुरस्कार विजेते मारुती आडकर, टाटा स्टीलचे शशी भूषण, भावेश रावल, हरीओम इलेक्ट्रॉनिक्सचे महेश राठी, डॉ रणजित मोहिते, कोयना समाजाचे अध्यक्ष पांडुरंग साळुंखे, विठ्ठलजी मोरे, एम. डी. चाळके, बळीराम शिंदे, जितेंद्र सकपाळ, उमेश कदम, दत्तात्रय सकपाळ, उद्योजक विक्रम पाटील, देवदूत गुरुनाथ साठेलकर, कार्मेल कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका सिस्टर निर्मल मारिया, सिस्टर लिली पॉल, क्रीडा शिक्षक समीर शिंदे, जयश्री नेमाने आणि सर्व शिक्षक यांच्याकडून होत आहे. पार्ले बिस्कीटचे व्यवस्थापक चंद्रकांत कुलकर्णी, आर्यन्स फ्रेंड्स फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे, कार्याध्यक्ष महेंद्र सावंत, सुधीर मुसळे, प्रवीण सावंत, अनिल सावंत, प्रमोद सावंत, महेश पवार, हनीफ कर्जीकर, अमोल कदम यांनी विशेष कौतुक केले.
क्षितिजाचे वडील जगदिश मरागजे हे क्रीडा शिक्षक असून ते राष्ट्रीय धावपटू आहेत. तसेच काका दिनेश व सचिन हे देखील राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे तिला खेळाचे हे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. क्षितिजाने प्रथमच राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत भाग घेत सुवर्ण पदक जिकण्याचा पराक्रम आपल्या नावावर केला आहे. क्षितिजा आणि सई हिला राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार संकुलाचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय खेळाडू तथा मार्गदर्शक राजाराम कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तसेच त्यांचा सराव करून घेण्यासाठी विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओंकार निंबळे, जयेश खरमारे, पायल मरागजे यांनी खूप मेहनत घेतली. क्षितिजा मरागजे आणि सई शिर्के यांच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page