Monday, April 15, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडखोपोली रुग्णालयात आलेल्या आई-वडिलांबरोबर इसमाने दोन वर्ष लहान मुलाला पळवले..

खोपोली रुग्णालयात आलेल्या आई-वडिलांबरोबर इसमाने दोन वर्ष लहान मुलाला पळवले..

खालापूर (दत्तात्रय शेडगे)
खोपोली शहरात सध्या पुराच्या संकटातून सावरत असताना अनेक वेळा चोरी च्या घटना कानावर येत आहेत मात्र रविवारी चक्क खोपोली नगरपालिका रुग्णालयाच्या आवारातून आई वडीला बरोबर आणलेला 2 वर्षाच्या लहानग्यांला त्याच्या त्याच्या बरोबर आलेल्या इसमाने पळवून नेल्याची घटना घडली.

या पलायन करणाऱ्या इसमाचा लहान मुलाला पळविताना सी सी टीव्ही मध्ये चित्रफीत कैद झाली असून या इसमाचा खोपोली पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते शोध घेत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की खोपोली शिलफाटा येथील मुळगाव धनगरवाडा येथे वास्तव्यात असणारे सोमनाथ आप्पा घाटे व त्याची पत्नी लहान 2 वर्षांचा मुलगा समर्थ हे कुटुंब 10 दिवसापूर्वी औरंगाबाद येथे कामाच्या ठिकाणाहून आले होते.

त्यांच्या समवेत एक त्याठिकाणी ओळखी झालेला इसम गजा हा ही खोपोली शहरात येऊन वास्तव्य करीत होता रविवारी सोमनाथ यांची पत्नी हिच्या पोटात दुखत असल्याने पती पत्नी व लहान मुलगा समर्थ व त्याच्या समवेत आलेला इसम गजा रिक्षाने खोपोली शहरात असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी रिक्षाने आले असता त्यांचा दोन वर्षांचा मुलगा समर्थ या त्याच्या बरोबर आलेल्या गजा कडे होता.

काही वेळा नंतर गजाने या समर्थ ला घेऊन पशार झाला काही वेळाने सदरची बाब सोमनाथ घाटे यांच्या लक्षात आल्याने तो आपल्या दोन वर्षांच्या समर्थ ला शोधत असताना कुठेच सापडला नाही त्यामुळे बरोबर आलेल्या गजा ने मुलाला पळवून नेल्याचा टाहो फोडल्याने या ठिकाणी अनेक नागरिक जमा झाले त्यानंतर सदरची बाब खोपोली पोकिसांना कळविल्याने तात्काळ रुग्णालयात येऊन माहिती घेतली असता शोधाशोध सुरू केली.

या दरम्यान सी सी टीव्ही फुटेज चेक केले असता त्यात सदरचा इसम गजा या मुलाला घेऊन जाताना दिसत असून सोमजाईवाडी च्या दिशेने गल्लीतून पशार झाल्याचे दिसत आहे या घटनेमुळे या लहानग्या ची आईच्या मुलाच्या जाण्यामुळे प्रकृती अधिक चिंताजनक बनल्याने तिच्यावर खोपोली पालिका रुग्णालयात उपचार सुरू केले आहेत मात्र सदरच्या हरवलेल्या समर्थ चा अद्याप तपास लागला नाही त्यामुळे खोपोली पोलीस बिट मार्शल, दामिनी पथक व सामाजिक कार्यकर्त्यांची टीम शेध घेत आहेत.

- Advertisment -

You cannot copy content of this page