गणेशोत्सवात मंदीर बंद असल्याने अष्टविनायक क्षेत्र महड येथील…… श्री वरदविनायक भक्तांची हिरमोड..

0
27

प्रतिनिधी (दत्तात्रय शेडगे)
सर्वत्र गणेशोत्सवाच्या धामधूम असल्याने गणेश भक्तांच्या आनंदाला पारावारा नसल्याने असंख्य भक्त उत्साही असल्याचे पाहायला मिळत असून भक्त आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाची पुजाअर्चा व मनोभावे प्रार्थना करित या सर्वातून विशिष्ट वेळ काढून आपल्या आराध्यदैवताचे दर्शन घेण्याची बाहेर पडत असतात.

परंतु कोरोनाचे वाढता प्रादुर्भावमुळे सर्वच मंदीर बंद ठेवल्याने भक्तांना मंदीरात जाऊन दर्शन घेणे शक्त होत नसल्याने सर्वच भक्तगण नाराज झाले असून अशीच नाराजी अष्टविनायक क्षेत्र महड गावातील श्री वरदविनायकांचे दर्शन घेण्यासाठी येणारे भक्त व्यक्त करीत आहेत.

तर सर्व भक्तगण श्री वरदविनायकाला मनोभावे प्रार्थना करीत ये श्री वरदविनायका या देशावरचे कोरोनाचे संकट दूर कर आणि सर्वाना आनंदाचे क्षण जगू दे अशी विनवणी करित आहे.अष्टविनायक क्षेत्रापैकी मानाचा गणपती म्हणून महड च्या श्री वरदविनायक बाप्पाची ओळख असून असंख्य भक्त येत आपल्या बाप्पाचे दर्शन घेत पुजा अर्चा करीत असत, परंतु कोरोनाने डोके वर काढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक नियमावली लावल्याने श्री वरदविनायक बंद ठेवण्याचे आदेश काढल्याने गेल्या काही महिन्यापासून मंदीर बंद झाल्याने अनेक भक्तगणांची हिरमोड झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवात महड येथील अष्टविनायक क्षेत्र श्री वरदविनायक बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्ताची हजेरी लागत असते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याठिकाणी कडक निर्बंध लावल्याने मंदीर बंद ठेवल्याने सर्व भक्तांनी दर्शनासाठी पाठ फिरवत शासनाच्या नियमाचे पालन केले असले. तरी सर्व भक्तगण खदखद व्यक्त करित आहे. तर मंदीर बंद झाल्याने याठिकाणच्या व्यापारी वर्गासमोर मोठे संकट उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळत आहे.