Sunday, July 14, 2024
Homeपुणेलोणावळागणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे रूट...

गणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे रूट मार्च…

लोणावळा दि.13 : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने भर पावसात करण्यात आले रूट मार्च.आगामी गणेशोत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्याकारिता कायदा व सुव्यस्थेच्या अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या वतीने भर पावसात हद्दीतील कुसगाव बुद्रुक, कार्ला व पवनानगर या गावांमध्ये रूट मार्च घेण्यात आला.


सदर वेळी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी गणेश मंडळे, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना गणेश विसर्जन दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही विसर्जन मिरवणूक काढणार नाहीत, विसर्जन घाटावर गर्दी होणार नाही यासाठी घराघरातील गणेशमूर्ती,गौरीगणपती गोळा करून एका ट्रॅक्टर मधून एकत्र विसर्जन स्थळी पोहचवतील याबाबत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांना आवाहन करण्यात आले आहे.


गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कालावधीत कोणत्याही कारणास्तव आणि कोणत्याही प्रकारे गालबोट लागेल अशा स्वरूपाची जातीय किंवा अन्य कोणतीही तेढ उत्पन्न होऊ नये यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशानव्ये सदर रूट मार्च काढण्यात आला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, सचिन बनकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रूटमार्च मध्ये पोलीस अंमलदार , होमगार्ड, महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

- Advertisment -

You cannot copy content of this page