गारमाळ परिसरात जनावरांची लसीकरण मोहीम सुरू पशु विभागाचा स्तुत्य उपक्रम..

0
103

खोपोली- दत्तात्रय शेडगे

गारमाळ येथे जनावरांना लाळ्या खुरकूत आजार होऊ नये यासाठी पशु विभागाने जोरदार पावले उचलली असून आज गारमाळ धनगर वाडा व गवळी वाडा येथील जनावरांना लाळ्या खुरकूत लसीकरण करून बिल्ले मारून आधार नंबर देण्यात आला.

खालापूर तालुक्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वरील खोपोली पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत येणाऱ्या गारमाळ (धनगर वाडा) व गवळीवाडा आणि दत्तवाडी ,आडोशी येथील जवळपास सहाशे शेतकऱ्यांच्या जनावरांना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ राजेंद्र गायकवाड आणि आणि सहकारी वाघमारे यांनी गाई म्हशी यांना लाळ्या खुरकूत लस देऊन बिल्ले मारून जनावरांना आधार नंबर देण्यात आला.
तर एखादे जनावर हरवले तर तेही शोधणे सोपे जाते या उद्देशाने पशु विभागाने पावले उचलली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.