Wednesday, May 29, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगावदेवी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा..

गावदेवी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सव साजरा..


खोपोली- दत्तात्रय शेडगे

पनवेल तालुका मधील वाजे गावामध्ये साईराज कॉलनी येथे भव्य शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिषेक करून करण्यात आली.

त्या नंतर दिवस दर्शन सुरू होते कार्यक्रमाचे औचीत साधून साईराज कॉलनीचे संस्थापक आदरणीय दिलीप शेठ दळवी यांच्या वतीने सर्व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ पार पडला, रात्री शिवाजी महाराजांची आरती करून घोषणा देण्यात आल्या ,नंतर कॉलनीतील लहान मुलाचे डान्स आणि पोवाडे यांचे कार्यक्रम साजरे करण्यात आले.

कार्यक्रमा निमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना महाप्रसादाची व्यवस्था ही करण्यात आली. होती..शेवटी कार्यक्रमाची सांगता ही भजनाने करण्यात आली. कार्यक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते सहकार्य करून मंडळाला मोलाचे सहकार्य केले यावेळी माजी सरपंच बबन पाटील, समाजसेवक नरेश दादा पाटील पो.पाटील .राजेश शेठ भोईर मा.सरपंच.दिलीप पाटील ग्रा. पं.सदस्यश्र हरिचंद् पाटील – सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिडे ऑल इंडीया धनगर समाज महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र पुकळे ,आनंदराव कचरे , उपस्थित होते.मंडळाच्या वतीने सर्व मान्यवर याचा मान सन्मान करण्यात आला.

यावेळी कॉलनीतील सर्व युवा कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक माता भगिनी उपस्थित होत्या.या वेळी या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. कॉलनीत युवा कार्यकर्ते आणि उत्कृष्ठ लेखक आणि वक्ते राम शिंदे यांनी केले.

- Advertisment -

You cannot copy content of this page