Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगुंडगे डम्पिंग ग्राउंड घन कचरा प्रकल्प हटाव ," भाजप युवा मोर्चा "...

गुंडगे डम्पिंग ग्राउंड घन कचरा प्रकल्प हटाव ,” भाजप युवा मोर्चा ” आक्रमक !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागात संपूर्ण शहराचा कचरा टाकण्याचा डंपिंग ग्राउंड आहे . प्रकल्पाच्या नावाखाली सुरू केलेल्या या गलिच्छ घन कचऱ्याच्या दुर्गंधीपासून आता जनता बेजार झाली आहे . याबाबतीत अनेक वेळा ग्रामस्थांनी होणाऱ्या जीवघेण्या त्रासाबाबत पालिकेला सांगूनही , भव्य मोर्चा काढूनही या गंभीर समस्येचे ठोस पाऊल पालिका प्रशासन उचलत नसल्याने याविरोधात आता ” भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा ” आक्रमक झाली असून पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी हा डंपिंग ग्राउंड त्वरित बंद करून , ठोस उपाय योजना न केल्यास यांवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडून , आमरण उपोषण करणार असल्याचे संतापजनक मत भाजपाचे नेते तथा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे यांनी व्यक्त केले आहे.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कर्जत शहर आता ” डम्पिंग ग्राऊंडच्या ” या जीवघेण्या समस्येवर आक्रमक होवून ” दंड थोपटून ” आता मैदानात उतरली आहे . आज गुरुवार दि. १४ मार्च २०२४ रोजी भारतीय जनता पार्टी कर्जत शहर युवा मोर्चाचा वतीने गुंडगे गावातील घनकचराच्या प्रश्नाविषयी मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेतली . डम्पिंग ग्राऊंड वर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे प्रभागात पसरणारी दुर्गंधी, लोकांना होणारा त्रास , त्याचबरोबर वयोवृध्द नागरिकांच्या तब्येतीवर होणारा विपरीत परिणाम , डासांमुळे वाढते रोगराईचे प्रमाण , खराब होणारी भातशेती , प्रकल्पाच्या नावाने चालवलेला सावळा गोंधळ , तर स्थानिक स्वराज्य संस्था असूनही नागरिकांच्या या ” गंभीर समस्येकडे ” पालिका प्रशासन करत असलेले जाणून बुजून दुर्लक्ष , याचा जाब तीव्र आंदोलन करून व आमरण उपोषणाचा मार्ग पत्करून पालिका प्रशासनाला द्यावा लागेल , असा इशारा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा सुनील गोगटे यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी वैभव गारवे यांना क्रोध निवेदन देताना भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुनील गोगटे , कर्जत शहर अध्यक्ष विजय जिनगरे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष अतुल बडगुजर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सर्वेश गोगटे , युवा मोर्चा सरचिटणीस प्रियांश जैन, युवा चिटणीस जय पेंदे , गुंडगे भाजप पदाधिकारी मिलिंद भोईर , सुजीत सोनावणे तसेच कर्जत मधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
- Advertisment -

You cannot copy content of this page