Sunday, April 27, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडगुंडगे येथे गुडशेफर्ड काॅन्व्हेंट स्कूल शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा...

गुंडगे येथे गुडशेफर्ड काॅन्व्हेंट स्कूल शाळेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महिलांचे सक्षमीकरण व त्यांच्या कला गुणांचा आदर शालेय दशकातून झाल्यास भविष्यात देशाची भावी पिढी महिलांना योग्य मानसन्मान देतील , हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभातातील ” गुड शेफर्ड कॉन्व्हेन्ट स्कूल ” येथे ” जागतिक महिला दिन ” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शाळेने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते . तर विद्यार्थ्यांनी यांत भाग घेवून आपला उत्साह द्विगुणित केला.

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कर्जत नगरपरिषदेच्या मा. नगरसेविका तथा सभापती पाणी पुरवठा समिती सौ. वैशाली दिपक मोरे या उपस्थित होत्या . विद्यार्थ्यांनी भाषणे , नृत्यकला , संगीत सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली , तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महान विभुतींच्या , व महान मातांच्या वेशभूषा करून त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यात आला .या कार्यक्रमातून महिलांचे सक्षमीकरण व त्यांची भविष्यातील वाटचाल यावर विशेष भर देण्यात आला.
याप्रसंगी मा. नगरसेविका सौ.वैशाली दिपक मोरे आणि मुख्याध्यापिका सिस्टर आमला यांनी विद्यार्थ्यांना महिला दिनाचे महत्त्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले .यावेळी मा. नगरसेविका सौ. वैशाली मोरे , मुख्याध्यापिका सिस्टर आमला , मॅनेजर सिस्टर प्रेसिला , सर्व शिक्षक वर्ग कर्मचारीवृंद , मोठ्या संख्येने विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ” जागतिक महिला दिनाचा ” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
- Advertisment -

You cannot copy content of this page