Tuesday, April 16, 2024
Homeपुणेलोणावळागुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन…

गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यात भव्य दिव्य शोभा यात्रेचे आयोजन…

लोणावळा (प्रतिनिधी):गुढी पाडव्यानिमित्त हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीणच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.लोणावळ्यातील पुरंदरे मैदानातून या शोभायात्रेला सुरुवात झाली आणि वाकसई ठिकाणी या यात्रेचा समारोप झाला.
या शोभायात्रेत हजारो दुचाकी गाड्यांना भगवे ध्वज लावण्यात आले होते. प्रत्येकाने डोक्यावर भगवा फेटा परिधान केला होता. हिंदू बंधू भगिनी पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते.
रॅलीमध्ये सर्वात पुढे भारत मातेची प्रतिमा,दुचाकीवरील महिला भगिनी, त्या मागोमाग प्रभू श्रीराम यांची प्रतिमा व आयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ व त्या मागोमाग दुचाकीवरील पुरुष मंडळी,सर्वात मागे डिजे व रुग्णवाहिका असे रॅलीचे स्वरुप होते.
पुरंदरे शाळा मैदानाहून सदर रॅली ही छत्रपती शिवाजी महाराज चौक,जयचंद चौक, मावळा पुतळा चौक, भगवान महावीर चौक या मार्गे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाने खंडाळा तलावापर्यत गेली. त्याठिकाणी निलकंठेश्वर मंदिरासमोरुन फिरुन ती पुन्हा गवळीवाडा येथे आली. मिनू गॅरेज मार्गे शोभायात्रा इंदिरानगर वरुन तुंगार्ली गावात,नारायणी धाम पोलीस चौकीसमोरुन वलवण गावात व मनशक्ती जवळून पुन्हा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर येत वरसोली, वाकसई चाळ मार्गे वाकसई फाटा येथे गेली. त्याठिकाणी शोभायात्रेचा समारोप झाला.
समारोपाच्या ठिकाणी गुढीपाडवा या हिंदू नववर्ष दिनाचे महत्व व महात्म्य सांगण्यात आले.अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही शोभायात्रा काढण्यात आली होती. सकाळी अकरा वाजता शोभायात्रेला सुरुवात झाली. लहान मुले, महिला, युवक, तरुण व ज्येष्ठ सर्वच जण या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page