Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडगुरुंप्रती नतमस्तक होण्यासाठी गीता सुधाकर घारे फाउंडेशनतर्फे " शिक्षक दिन " सोहळ्याचे...

गुरुंप्रती नतमस्तक होण्यासाठी गीता सुधाकर घारे फाउंडेशनतर्फे ” शिक्षक दिन ” सोहळ्याचे आयोजन !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” गुरू शिवाय विद्या नाही ” बाल पणापासून कोवळ्या मनावर ” आकार – आधार – संस्कार ” रुजवून महत्त्वपूर्ण काम करून देशाची भावी पिढी घडविण्याचे कार्य गुरुवर्य अर्थात शिक्षक करत असतात . अश्या या गुरुंप्रती त्यांनी केलेल्या या देशव्यापी कार्यास नतमस्तक होवून त्यांना सन्मानित करण्याच्या उद्दात्त हेतूने ” गीता सुधाकर घारे फाऊंडेशनचे ” संस्थापक तथा राजिपचे उपाध्यक्ष व शिक्षण – आरोग्य – क्रिडा सभापती मा. सुधाकर शेठ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ” शिक्षक दिन सोहळा ” मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वाजता शेळके मंगल कार्यालय, किरवली ता.कर्जत, जि.रायगड येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

भारताचे मा. राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनी संपूर्ण देशात ” शिक्षक दिन सोहळा ” साजरा होत असतो . शिक्षक दिनाचे औचित्य साधून गीता सुधाकर घारे फाउंडेशन – खांडपे यांच्या वतीने कर्जत व खालापूर तालुक्यातील केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.

” मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या ” सर्जनशील हातांप्रमाणे शिक्षक मुलांना आकार देत असतात. राष्ट्रउभारणीचे काम करणाऱ्या शिक्षकांना सलाम करण्यासाठी यावेळी प्रमुख उपस्थिती मा. श्री. चंद्रकांत साबळे ( गटविकास अधिकारी – पंचायत समिती कर्जत ) , मा. श्री. संतोष दौंड ( गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती कर्जत ) , मा. श्री . संदीप कराड ( गटविकास अधिकारी, पंचायत समिती खालापूर ) , मा .श्री .कैलास चोरामळे ( गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती खालापूर ) यांची असणार आहे , तरी सदर ” शिक्षक दिन सोहळ्यास ” आपण उपस्थित राहून आपला सन्मान स्वीकारावा, व इतर सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे , अशी विनंती व आवाहन सुधाकर शेठ परशुराम घारे – अध्यक्ष, गीता सुधाकर घारे फाउंडेशन व मा. उपाध्यक्ष तथा सभापती, शिक्षण – आरोग्य व क्रीडा, राजिप. व श्री. संजय रामचंद्र खडे – सचिव, गीता सुधाकर घारे फाउंडेशन ( इंग्रजी व सेमी इंग्रजी मिडीयम स्कूल ) यांनी केले आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page