Wednesday, September 27, 2023
Homeपुणेमुळशीगेलदांड धनगरवस्तीवर पाण्याची टंचाई.. महिलांना करावी लागतेय 1 किमीची पायपीट...

गेलदांड धनगरवस्तीवर पाण्याची टंचाई.. महिलांना करावी लागतेय 1 किमीची पायपीट…

मुळशी (दत्तात्रय शेडगे ) तालुक्यातील असलेल्या गेलदांड धनगरवस्तीवर पाण्याची टंचाई निर्माण झाली असून येथील ग्रामस्थांना 1 किमीची पायपीट करून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे.तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेची असलेल्या आंबवणे ग्रामपंचायत हद्दीत ही धनगर वस्ती येत असून गेलदांड धनगरवस्ती येथे 20ते 22 घरांची वस्ती आहे.

मात्र येथे ग्रामपंचायतने पाईप लाईन टाकली होती मात्र ती आता नादुरुस्त होऊन बंद पडली आहे ,त्यामुळे येथील महिलांना दररोज 1 किमीची पायपीट करून विहिरीवरून डोक्यावर पाणी आनावे लागत आहे,येथे सहारा अंबि व्हॅली परिसरात ही वस्ती असून या वस्तीवर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

त्यामूळे येथील महिलांना 1 किमीची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे ग्रामपंचायत टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असून कायमस्वरूपी येथील पाण्याची समस्या संपेल अशी उपाययोजना ग्रामपंचायतने करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -