अधिकारी वर्गाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष,गणेश उत्सवा अगोदरच संपर्क होत नसल्याने स्थानिकांची मोठी अडचण.
दत्ता शिंदे –माथेरान
माथेरान मध्ये गेल्या 15 दिवसापासून मोबाईलच्या कोणत्याच सिमकार्डचे नेट वर्क नसल्याने स्थानिकांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामना करावा लागत आहे, मोबाईल मध्ये फुल नेटवर्क दिसत असले तरी फोन लावल्यास, आपला किंवा समोरच्याचा आवाज, शब्द नीटसे समजून येत नाही, त्या मुळे एखाद्याला फोन लावून लावून मोबाईल ची बॅटरी संपते आणि रिचार्ज ही संपत आहे. व्हॉट्सउप कॉल शिवाय फोन लागत नाही.
सद्या सर्वत्र फक्त कोरोना एके कोरोनाचीच चर्चा आहे, त्यातून सर्वच जीवनमान पुरते बदलून गेले आहे, प्रत्येक नागरिक मानसिक त्रासात वावरताना दिसतोय. सद्या गणेशोत्सव व मोहरम, सण तोंडावर येऊन ठेपले आहेत त्यातच वेगवेगळ्या सूचना नियमावली सरकारकडून येत आहेत. शाळाचे सध्या ऑनलाइन क्लास सर्वत्र सुरू आहेत.मात्र ऎन क्लासच्या वेळी आवाज जाणे नेट जाणे हा प्रकार होताना दिसत आहे, त्यातच गणेशोत्सव, मोहरम साठी आपल्या नातेवाईकांना फोनही लावता येत नाही, सद्या 10 वी 12 वीचे रिझल्ट लागून ऑनलाइन फार्म भरणे झाले असले तरी त्या साठी लागणाऱ्या उत्पनाचे दाखले इतर डॉक्युमेंट साठी नेटवर्क मुळे येथील नागरिकांनाअनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
. बँकेच्या व्यवहारात ही नेट मुळे प्रॉब्लेम आहेच. सद्या कोणत्याही मोबाईल सिमचे येथे ऑफिस नाही, येथील मोबाईल सिमच्या तक्रारी कोणाकडे करायच्या हा प्रश्नच आहे, येथे फक्त व्हाट्सअप कॉल लागत आहे बाकी नॉट रीचेबल.. बीएसएनएलचे माथेरान मध्ये पूर्वी ऑफिस होते, तेथे कर्मचारी वर्ग काम करीत असे पण तेही आता ऑफिस बंद करण्यात आले आहे. येथील स्थनिक दुकानदार प्रिया लोखंडे ही बीएसएनएल ची माथेरान एजंट आहे परंतु तिचे लग्न झाल्यामुळे bsnl प्रॉब्लेम कोनाकडे सांगायचे हा प्रश्न आहेच व्होडाफोन चे रायगड नेटवर्क प्रॉब्लेम चे प्रतिनिधी सुनील कश्यप, मनोहर देशमुख ह्याच्याशी संपर्क केला असता फोन उचलत नाही उत्तर देत नाही त्या मुळे मागील 15 दिवसांपासून सर्व नागरिक त्रस्त आहेत.
माथेरान मध्ये एकूण 7 ते 8 दुकानांतुन मोबाईल चे रिचार्ज होत आहेत. यांना कंपनीचे नेट प्रॉब्लेम व इतर गोष्टीसाठी कोणाला फोन करायचा हे माहीत असते. जेव्हा प्रॉब्लेम असतो तेव्हा ह्या सर्व दुकानदारांनी संबंधीत सिम कंपनीला कळविणे क्रमप्राप्त आहे,पण असे होताना दिसत नाही. काही विचारले असता तिकडूनच नेट नाही, प्रॉब्लेम आहे अशी उत्तरे मिळतात, पण आपली जबाबदारी थोडी ओळखून असे कोणीही केलेले दिसत नाही. ते जर अशी तक्रार करतही असतील तर कंपनीने काय उत्तर दिले त्याचे आपल्या ग्राहकांना व्हाट्सअप द्वारे कळविणे महत्त्वाचे आहे. जेणे करून ग्राहक, दुकानदार यांचे दृढ संबंध कायम राहतील, आज ग्राहक आपल्याच दुकानात रिचार्ज करून पैसा खर्च करतोय पण त्या रिचार्ज चा मोबदला मात्र नॉट रीचेबल होताना दिसतोय, म्हणजेच ग्राहकाल नाहक खर्च सोसावा लागत आहे. याला जबाबदार कोण? दुकानदार , की सिम कंपनी,तरी सर्व मोबाईल ग्राहकांनीआता जागृत राहून आपण ज्या ठिकाणी रिचार्ज करत आहात त्यांना आपले मोबाईल नेट प्रॉब्लेम कळविणे गरजेचे आहे जेणे करून दुकानदार लगेच संबंधित सिम कंपनीला कळवून आपल्या तक्रारींचे निवारण करण्यात सहकार्य करतील. दुकानदार आणि ग्राहकांनी एकमेका साह्य करू मोबाईल करू रिचार्ज असे बोलणे या घडीला वावगे ठरणार नाही.
सद्या मी 5 वि ते 10 विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लास घेत आहे, परंतु 10 दिवस झाले, नेटवर्क प्रॉब्लेम येत असल्याने क्लास पूर्ण होत नाही, अनेक विद्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे, पालक वर्ग चिंतेत आहे, तेच तेच पोर्शन पुन्हा पुन्हा घ्यावे लागत असल्याने वेळ वाया जात आहे, आम्हीही ह्या नेटवर्क प्रॉब्लेम मुळे हैराण आहोत.
स्वाती सुनील कुमार-शिक्षिका कॉन्व्हेंट स्कुल
मी सध्या मुबईहून गणपती साठी माथेरानला आलोय, माझा जॉब ची सर्व कामे आम्हाला घरी बसून करण्यास दिली आहेत ती कामे करताना नेटवर्क नसल्याने मिटींग,अटेंट होत नाही, महत्वाचे कॉल, मिस होत आहेत, कस्टमर मिस होत आहेत,प्रोग्रॅम करताना नेट गेल्यास पुन्हा पुन्हा सुरवात करावी लागत आहे, खूप त्रास नुकसान होत आहे,