if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
धनगर वाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मूर्ती फार्मा, व साखरे फार्मा यांच्या वतीने खड्डे भरल्याचा विडिओ पहा.
खोपोली- दत्तात्रय शेडगे
सुधागड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई धनगर वाडा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील मूर्ती फार्मा, व साखरे फार्मा यांच्या वतीने खड्डे भरल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटली तरीही खालापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असलेल्या खडई धनगर वाडा ,आदिवासी वाडी, ठाकूरवाडी, अश्या अनेक वाड्या या ठिकणी आहेत, मात्र या गावासाठी नीट रस्त्यांची सोय नसल्याने ग्रामस्थांना अतोनात हाल सहन करावे लागत आहेत.
खडई ते गोंदाव हे तीन किलो,मी चे अंतर असून आजही येथे मातीचा कच्चा रस्ता आहे, या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावरील माती वाहून गेली होती त्यामुळे येथील ग्रामस्थांचा नाहक त्रास सहन करावा लागत होता याची सामाजिक कार्यकर्ते अशोक पाठारे व संतोष घाटे यांनी पुढाकार घेत संस्थाच्या पुढाकाराने व स्वही खर्च करीत या रस्त्यावर पडलेले खड्डे, खडी ,गिरीट टाकून भरले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी यांचे आभार मानले आहेत, यावेळीसुधीर साखरे, हिमाबिंदू ओकालका, सामाजिक कार्यकर्ते अशोक पाठारे, संतोष घाटे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया-
देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष उलटले तरीही आमच्या गावाचा आजूनही रस्ता झाला नसून स्थानिक लोक प्रतिनिधी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत.
संतोष घाटे ग्रामस्थ- खडई