Thursday, February 22, 2024
Homeपुणेतळेगावगोवा निर्मित तब्बल 1कोटी 5 लक्ष चा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन...

गोवा निर्मित तब्बल 1कोटी 5 लक्ष चा दारू साठा जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई…

तळेगाव (प्रतिनिधी): गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना तळेगाव दाभाडे येथून अटक करण्यात आली आहे . राज्य उत्पादन शुल्क , तळेगाव विभाग पथकाने बुधवार दि. 23 रोजी ही कारवाई केली . या कारवाईत विदेशी मद्यासह तब्बल 1 कोटी 5 लक्षचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे .
याप्रकरणी वाहन चालक प्रवीण परमेश्वर पवार ( वय 24, रा . तांबोळे , ता . मोहोळ ) व देविदास विकास भोसले ( वय 29 , रा . खवणी , मोहोळ जि . सोलापूर ) यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक चरणसिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार , जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरून गोवा राज्य निर्मीत व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याची महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती . त्यानुसार तळेगाव दाभाडे येथील हॉटेल शांताई समोर रोडवर सापळा रचून आरोपी पवार व भोसले यांना ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर ट्रक क्र.( MH 46 AF 6138 ) याची तपासणी केली . त्यात विदेशी मद्याने भरलेले 1 हजार 267 खोके आढळून आले . या खोक्यांमध्ये एकूण 1680 मिलीचे विदेशी मद्य होते . ते जप्त करण्यात आले . तसेच मालाची वाहतूक करणारा भारत बेंझ ट्रक व 87 लाख 89 हजार 520 रूपये किंमतीचे विदेशी मद्य असा एकूण 1 कोटी 5 लक्ष 7 हजार 520 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक दिपक सुपे हे करत आहेत .
सदरची कामगिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रविण शेलार , दुय्यम निरीक्षक दिपक सुपे , दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी , संजय राणे , योगेंद्र लोळे , महेश लेंडे , स्वाती भरणे , सहा . दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे , रवी लोखंडे व जवान भागवत राठोड , राहुल जौंजाळ , रसुल काद्री , तात्या शिंदे , दत्ता पिलावरे , शिवाजी गळवे आदींच्या पथकाने केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page