Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्सहात साजरा…

ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्सहात साजरा…

कार्ला (प्रतिनिधी) : ग्रामदेवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुस्त्यांच्या जंगी आखाड्याने या उत्सावाची सांगता झाली. मागील दोन वर्ष कोरोनामुळे उत्सव न झाल्याने यावर्षी ग्रामस्तांसह पंचक्रोशीतील सर्वांना या उत्सवाची उत्सुकता लागली होती.
पौष पौर्णिमेला उत्सवाची सुरुवात झाली. सकाळ पासून ग्रामदैवत भैरवनाथांचे दर्शन घेण्यासाठी एमटीडीसी येथील भैरवनाथ मंदिरात भाविकांनी रांगा लावल्या होत्या. सायंकाळी चार वाजता देवाच्या पालखीला ढोल ताशा, बँड पथकाच्या गजरात व फटाक्यांची अतिषबाजी करत मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण गावातील सुवासिनींनी पालखीचे यथासांग स्वागत करत देवाची पुजा केली.
शेवटी पुन्हा पालखी गावातील मारुती मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली. पाटण येथील स्वामी विवेकानंद भजनी मंडळाचे भजन मंदिरात ठेवण्यात आले होते. तर रात्री मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील नामवंत लोकनाट्य कै. आनंदराव हाडशीकर प्रस्तुत मा. सचिन हाडशीकर व सचिन पुणेकर यांचा मनमोहक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी हजेरीचा वग तर शनिवारी 7 जानेवारी रोजी सायंकाळी 4 नंतर कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. यामध्ये अनेक नामवंत पैलवान व गावातील स्थानिक तरुणांनी व लहान मुलांनी सहभाग घेतला होता. शंभर रुपये ते दहा हजार रुपये पर्यंत कुस्त्या पार पडल्या. मावळ, मुळशी, हवेली, कर्जत, कल्याण, पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक येथील मल्लांनी आखाड्यात हजेरी लावली होती. कार्ला पंचक्रोशीतील नागरिक हा आखाडा पाहण्यासाठी उपस्थित होते. उत्सव कार्यक्रमाचे संयोजन भैरवनाथ उत्सव कमिटी व समस्त ग्रामस्त कार्ला यांच्या वतीने करण्यात आले होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page