Friday, June 14, 2024
Homeपुणेलोणावळाग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचा तीन गावांत रूट मार्च…

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा पोलिसांचा तीन गावांत रूट मार्च…

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा विभागातील कुणेनामा, वरसोली व देवले या तीन ग्रामपंचातीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे मतदान रविवार दि.18 रोजी होणार आहे.
मतदान काळात तणावमुक्त व भितीमुक्त वातावरणात नागरिकांनी मतदान करावे,तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबतचा संदेश देण्यासाठी वरसोली, देवले व कुणे नामा या तीन्ही गावांच्या हद्दीत लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक IPS सत्यसाई कार्तिक यांच्यासह लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सचिन राऊळ, संदेश बावकर यांच्यासह दोन्ही पोलीस स्टेशनचे कर्मचारी व होमगार्ड यांनी रुटमार्च काढला होता.
मतदान केंद्र व परिसरात कोणीही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला अथवा मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या रुटमार्च मधून देत नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन करण्यात आले.
- Advertisment -

You cannot copy content of this page