ग्रामसेवक किशोर पवार यांचा निरोप समारंभ संपन्न..

0
176

(खालापुर दत्तात्रय शेडगे)
सुधागड तालुक्यातील माणगाव बुद्रुक ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक किशोर प्रकाशराव पवार यांची बदली झाल्याने त्यांचा आज शाल श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन निरोप समारंभ करण्यात आला.

तालुक्यातील प्रतिष्टेची माणगाव बुद्रुक ही ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत मधील कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत किशोर पवार यांनी गेली चार वर्षे ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शी पार पाडला ,मात्र त्यांची आता बदली जळगाव या ठिकाणी झाल्याने त्यांचा आज सरपंच ग्रामसेवक सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ पार पडला.

सरपंच उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थाच्या वतीने त्यांचा आज शाल श्रीफळ , नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना निरोप देण्यात आला.यावेळी सरपंच माधवी मनीष पालवे, उपसरपंच वासंती गणेश दळवी, सदस्य संतोष बोडेकर, विलास पालवे, श्याम दळवी, सदस्या सुरेखा बोडेकर, राखी प्रवीण साळुंखे, सानिया संदीप मानकर, शेब्या लहाण्या हिलम,सुशीला बाजीराव भाकरे, कर्मचारी मंगेश राघू गाऊडसे, सुषमा प्रमोद देशमुख दीपाली सागर ढोकले, सामाजिक कार्यकर्ते बाळू आंग्रे,आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.