Thursday, May 30, 2024
Homeपुणेलोणावळाग्लोबल आंबेडकराईट कानव्हेन्शनच्या जागतिक आंबेडकरी अधिवेशनासाठी लोणावळ्यातील डॉ. सुनील जाधव यांचा युरोप...

ग्लोबल आंबेडकराईट कानव्हेन्शनच्या जागतिक आंबेडकरी अधिवेशनासाठी लोणावळ्यातील डॉ. सुनील जाधव यांचा युरोप दौरा…

लोणावळा (प्रतिनिधी):ग्लोबल आंबेडकराईट कन्व्हेन्शन कोअर कमिटी आयोजित जागतिक आंबेडकरी अधिवेशनासाठी लोणावळ्यातील सुप्रसिद्ध व सिनिअर दंत चिकित्सक डॉ. सुनील धोंडीराम जाधव यांना 15 दिवसीय युरोप दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून त्यांनी दि.17 रोजी लंडनकडे प्रस्थान केले आहे.
डॉ. सुनील जाधव यांचा हा युरोप दौरा बारा ते पंधरा दिवसांचा असून यामध्ये लंडन, जर्मनी, फ्रांस, स्वीझरलँड अशा प्रसिद्ध देशांना ते भेट देणार आहेत.त्यांच्या या यूरोप दौऱ्यासाठी अनेक मित्र व शुभ चिंतकांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमाची सुरूवात डोमिनियन द 1 ग्रीन सेंटर येथे मेजवानी आणि प्रास्ताविक सत्राने होईल. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स/स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज, ब्रिटीश येथे सेमिनार होतील.संसद आणि डॉ. आंबेडकर संग्रहालय लंडन,वेस्टममधून प्रतिनिधित्व करणारे बौद्धिक आणि शैक्षणिक आंबेडकरवादी, ग्लोबल आंबेडकर कन्व्हेन्शनचे मुख्य समन्वयक हरबंस विरडी,प्रा.विवेक कुमार,प्रा.के.पी.सिंग,प्रा.सी.डी. नाईक, प्रा. कांचा इलैया शेफार्ड, प्रोफेसर केविन ब्राउन, प्रो.विनटला थोरात आणि डॉ काश्मीर सिंग आयपीएस आदी या अधिवेशनात प्रतिनिधित्व करणार आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page