Friday, February 23, 2024
Homeपुणेलोणावळाघरातून निघून गेलेल्या 13 वर्षीय मुलीला अवघ्या तीन तासातच शोधण्यात लोणावळा ग्रामीण...

घरातून निघून गेलेल्या 13 वर्षीय मुलीला अवघ्या तीन तासातच शोधण्यात लोणावळा ग्रामीण पोलिसांना यश…

लोणावळा (प्रतिनिधी):वरसोली गावात राहणारी एक अल्पवयीन मुलगी घरात झालेल्या किरकोळ वादानंतर घर सोडून निघून गेली होती . या अल्पवयीन मुलीचा शोध घेवून अवघ्या तीन तासामध्ये नातेवाईकांच्या ताब्यात देण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश आले आहे .
सदर 13 वर्षीय मुलगी ही घरामध्ये किरकोळ भांडण झाल्याने घरातून निघून गेली होती . नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेवूनही ती सापडली नाही .त्यावेळी घरचांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली व सर्व हकीगत सांगितली . त्या माहितीवरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सदर मुलीबाबत कुठलाही धागादोरा नसताना उपलब्ध इलेक्ट्रॉनीक माध्यमांच्या आधारे तीचा शोध घेवून अवघ्या तीन तासामध्ये मुलीला सुखरुप आई वडलांच्या ताब्यात देण्यामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीसांनी यश संपादन केले .
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल , अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे , लोणावळा उप विभागाचे अधिकारी सहा . पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युवराज बनसोडे , पोलिस हवालदार नितीन कदम यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page