Sunday, June 23, 2024
Homeपुणेमावळचंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ वडगांव मावळ तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा….

चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ वडगांव मावळ तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध मोर्चा….

मावळ (प्रतिनिधी): पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी राष्ट्रपुरूषांविषयी जे अवमानकारक वक्तव्य केले त्याच्या निषेधार्थ आज मंगळवार दि.13 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10:00 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निषेध मोर्चाची सुरुवात करण्यात आली.तर सांगता तहसिल कार्यालय येथे निवेदन देऊन करण्यात आली.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पैठणच्या सभेत महर्षी भाऊराव पाटील , महात्मा ज्योतीबा फुले व भारतरल डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी भिक मागून शाळा काढल्या असे बेजबाबदार वक्तव्य करून जो राष्ट्रपुरूषांचा अवमान केला त्याचा निषेध म्हणून मावळ तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यावेळी चंद्रकांत पाटील यांना पदमुक्त करण्यात यावे तसेच त्यांच्यावर शाही फेक करणाऱ्या तरुणावरील गुन्हा मागे घेण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे,तळेगाव शहर अध्यक्ष गणेशजी काकडे, बहुजन सोशालिस्ट पार्टीचे पुणे ग्रामीण अध्यक्ष किरण साळवे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी चे बबन ओव्हळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) जिल्हा अध्यक्ष विकासजी साळवे, जिल्हा परिषद सदस्य बाबुरावजी वायकर, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला आघाडी अध्यक्षा दिपाली गराडे,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड. रंजनताई भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे तळेगाव शहराध्यक्षा करुणा सरोदे,तळेगाव नगरीचे नगर सेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव शहर प्रवक्ता अरुणजी माने, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण टपाले, भटके विमुक्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे,वंचित बहुजन आघाडीचे संतोष लोखडे, वृषाली विरगुजर यांसह मावळ तालुक्यातील जेष्ठ नेते मंडळींमध्ये भारीपचे माजी अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड, एसआरपीचे संत तुकाराम साखर कारखान्या चे संचालक बाळासाहेब गायकवाड,एसआरपी जिल्हा अध्यक्ष सखारामजी गायकवाड, कोंडीबाजी रोकडे,बहुजन समाज पार्टीचे प्रकाश गायकवाड,भारत मुक्ती मोर्चाचे रवि पंडगळे,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगर सेवक महानगर नियोजन समिती सदस्य संतोषजी भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मोर्चाच्या समरोप वेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तीव्र भाषेत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला तर ज्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटलांना वरती शाही फेक केली त्यांच्यावरती 307 व एकूण 12 कलमे लावण्यात आली ती खोटी कलमे असून त्यांच्यावरील गुन्हा मागे घेण्यात यावा असे आमदार शेळके यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंतजी कदम यांनी केले, प्रास्ताविक सुहासजी गरुड यांनी केले तर आभार बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे पुणे ग्रामीण अध्यक्ष किरण साळवे यांनी केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत निषेध नोंदविला.सदर मोर्चात महिलावर्ग,तरुण कार्यकर्ते आदींनी मोठया संख्येने आपला सहभाग नोंदविला.
- Advertisment -

You cannot copy content of this page