मावळ (प्रतिनिधी): चक्क दुधाच्या टँकर मधून गोमांस वाहतूक प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून दोन जणांना वडगांव मावळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.त्यांच्या कडून एक टँकर आणि मोटारीसह सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदर कारवाई पुणे मुंबई महामार्ग तळेगाव फाट्यावर 1:45 वा. च्या सुमारास करण्यात आली.
याप्रकरणी शाहीद कुरेशी, व योगेश रोहिदास गोरडे (वय 34, दोघेही रा. जुन्नर ) यांना वडगांव मावळ पोलिसांनी अटक केली आहे.तर दोन जण पसार होण्यात यशस्वी झाले.
वडगांव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरडे घेऊन जाणारा दुधाचा टँकर मंगळवार दि. 20 जून रोजी पहाटे 1:45 वा.च्या सुमारास वडगाव- तळेगाव फाटा येथे पकडला. ज्यात गाय व बैलाचे मांस आढळून आले. त्यानंतर गोरक्षकांनी पाठलाग करून मुंढावरे फाटा येथे पकडलेल्या मोटारीतही गाय व बैलाचे मांस आढळून आले. ते कामशेत पोलिसांच्या मदतीने वडगाव पोलिस ठाण्यात जमा केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून दोघे पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक सस्ते पुढील तपास करत आहेत.