Friday, June 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचला लस घेऊ या , भिसेगाव कोरोना मुक्त करु या !

चला लस घेऊ या , भिसेगाव कोरोना मुक्त करु या !

नगरसेवक सोमनाथ ठोंबरे – नगरसेविका पुष्पाताई दगडे व ग्रामस्थांच्या मदतीने भिसेगाव येथे लसीकरण शिबिर संपन्न..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कोरोना संसर्ग महामारी हद्दपार करण्याच्या हेतूने व ग्रामस्थांची सुरक्षा जोपासण्याच्या कामी कर्जत नगर परिषद हद्दीत सर्वांत अग्रेसर असलेल्या भिसेगाव प्रभागात ग्रामस्थ मंडळ – महिला व युवा मंडळाच्या सहकार्याने नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांचे कार्य नक्कीच वाखाणण्याजोगे म्हणावे लागेल.

कोरोना काळातील या दोन वर्षांत भिसेगाव युवक मंडळ व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी स्वच्छता अभियान , अलाऊन्समेंट करून सावधानता बाळगणे , सॅनिटायझर स्टँड उभारणे , फवारणी करणे , आरोग्य तपासणी , मास्क वाटप , गरीब – गरजू कुटुंबांना एक हात मदतीचा देऊन अन्न – धान्य वाटप , ग्रामस्थांना कशेळे येथे नेऊन कोरोना लसीकरण करणे , कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत , गोळ्या – औषधांची मदत , आठ दिवस गाव लॉकडाऊन केले असता भाजीपाल्याची व्यवस्था , आदी कार्यात भिसेगाव ग्रामस्थांच्या मदतीने नगरसेवक सोमनाथ ठोंबरे यांनी हि महत्वपूर्ण कार्य पुढाकाराने करून भिसेगाव हा प्रभाग अव्वल ठेवला आहे.

भविष्यात कोरोना महामारीला तितक्याच ताकदीने लढा देण्यासाठी कवचकुंडले रुपी लस महत्वाची समजून आज दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या भिसेगाव प्रभागात कर्जत नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने नगरसेवक सोमनाथ ठोंबरे व नगरसेविका सौ.पुष्पाताई हरिश्चंद्र दगडे यांच्या वतीने व भिसेगाव ग्रामस्थ – महिला व युवा मंडळ यांच्या सहकार्याने कोविड – १९ लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.


कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील , नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी त्याचप्रमाणे कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज बनसोडे यांच्या माध्यमातून व नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , नगरसेविका सौ.पुष्पाताई दगडे यांच्या वतीने भिसेगाव प्रभागात पाल टॉवर येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते.

कोव्हीशिल्ड पहिला व दुसरा डोस उपलब्ध करून यावेळी भिसेगाव प्रभागातील २३६ नागरिकांनी व महिला वर्गांनी लस घेऊन सहकार्य केले.या लसीकरण शिबिरास नगराध्यक्षा सौ.सुवर्णा केतन जोशी ,भिसेगाव प्रभाग नगरसेविका सौ.पुष्पाताई दगडे , माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत शहर कार्याध्यक्ष राजेशदादा लाड , महिला तालुका अध्यक्षा रंजना धुळे ,उकरूळच्या सरपंच वंदना थोरवे, वदपच्या माजी उपसरपंच मनीषा पाटील यांनी भेट दिली.

तर श्री.संजय ब. हजारे – पोलीस पाटील भिसेगाव , यांचे तसेच विशेष सहकार्य ग्रामस्थ मंडळ , महिला मंडळ व युवा वर्ग भिसेगाव यांचे लाभले .भिसेगाव प्रभाग कोरोना मुक्त करण्यासाठी पुन्हा लसीकरण शिबिर आयोजित करण्यात येईल , असे नगरसेवक सोमनाथ मा. ठोंबरे यांनी सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page