Saturday, July 27, 2024
Homeक्राईमचाकण एमआयडीसी परिसरात चोरी करणारे दोन चोरटे चाकण पोलिसांच्या जाळ्यात, चार लाखांचा...

चाकण एमआयडीसी परिसरात चोरी करणारे दोन चोरटे चाकण पोलिसांच्या जाळ्यात, चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

तळेगाव (प्रतिनिधी):चाकण एमआयडीसी परिसरात चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना चाकण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 4 लाख 21 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अशोक विलास खिल्लारे (वय 27 रा. भोसरी) व कबीर लालसिंग गौर उर्फ राहूल (वय 26 रा.चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्या विरोधात 10 मार्च रोजी सासवड हिंट ट्रान्सफर कंपनीचे मॅनेजर पवनकुमार सिंह यांनी कंपनीतील 350 किलो वजनाचे तांब्याचे रोल चोरीला गेल्याची तक्रार दिली होती.
यावरून चाकण पोलीस तपास करत असताना घटनास्थळावरील पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यावेळी चोरटे चोरीसाठी रिक्षाने येवून घरफोडी करत असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस हवालदार संदिप सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत खबर मिळाली की. आळंदी फाटा येथे चोरीचा माल विक्रीसाठी ते ग्राहक शोधणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व संशयीत दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण तांब्याचा रोल व रिक्षा (एमएच 14 एच एम 3491) असा एकूण 4 लाख 21 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड करत आहेत.
हि कारवाई चाकण पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल देवडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सयाहक पोलीस फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार राजू जाधव, संदिप सोनावणे, पोलीस नाईक हनुमंत कांबळे, निखील शेटे, भैरोबा यादव , पोलीस कॉन्स्टेबल नितीन गुंजाळ, निखिल वर्पे, अशोक दिवटे, प्रदीप राळे, सुनिल भागवत, चेतन गायकर यांनी केली.
- Advertisment -

You cannot copy content of this page