चाकण पोलीस उपनिरीक्षकासाठी लाच घेताना ,पंटर एसीबीच्या जाळ्यात…

0
161

पोलिसी कारवाई न करण्यासाठी उपनिरीक्षकाने मागितली लाच…लाच घेताना मध्यस्ती पंटर एसीबी च्या जाळ्यात..

पिंपरी दि.30 : एका तरुणा विरुद्ध कारवाई न करण्यासाठी चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे याने 70 हजाराची लाच मागितली तर त्याच्यावतीने लाच घेताना अख्तर शेखावत अली शेख (वय 35 ) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला.

सदर अख्तर शेखावत अली शेख याला एसीबी पथकाने अटक केली असून उपनिरीक्षक झेंडे हा तपासासाठी बाहेरगावी गेल्याने त्याला अटक झालेली नाही.

याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. की सदर तक्रारदाराच्या विरुद्ध चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती आणि त्यावर कारवाई न करण्यासाठी झेंडे याने 70 हजार रुपयांची मागणी केली. त्यात मध्यस्ती असणारा शेख याने स्वतासाठी 15 हजार घ्यायचे ठरविले. त्यामुळे एकूण 85 हजार रुपये त्याने तक्रारदार तरुणाकडे मागितले. मात्र, त्याला लाच द्यायची नव्हती. म्हणून त्याने एसीबी कडे तक्रार दिली. या तक्रारीची खातरजमा झाल्यानंतर काल चाकण पोलिस ठाण्यातच हा सापळा लावण्यात आला होता आणि त्यात लाच घेणारा एसीबी च्या जाळ्यात अडकला आहे. आता पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे या पोलीस उपनिरीक्षकावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे आणि अतिरिक्त अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

तसेच कोणी शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी एसीबी चे पोलीस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांनी केले आहे.