चावणी उंबरखिंडीत विजय दिन सोहळ्याचे आयोजन..

0
256


३६० वा विजयदिन सोहळा पडणार पार..

खोपोली- दत्तात्रय शेडगे

खालापूर तालुक्यातील चावनी समरभूमी उंबरखिंडीत येथे ग्रुप ग्रामपंचायत चावनी आणि ग्रामस्थ , पंचायत समिती खालापुर,आणि शिवदूर्ग मित्र लोणावळा यांच्या वतीने ३६० वा विजयदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

हा विजयदिन सोहळा मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२१ रोजी चावणी ता खालापूर जी रायगड येथे पार पडणार आहे.
२ फेब्रुवारी १६६१ रोजी छत्रपती शिवराय व सरनौबत नेताजी पालकर यांनी करतलबखान यांच्यावर समरभूमी उंबरखिंड येथे मोजक्या मावळ्यांसह प्रचंड मोठा विजय मिळवला होता म्हणून ,या दिवसाचे स्मरण व विजय दिन म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी चावणी (छावणी) यांच्या वतीने मोठ्या उत्साहात विजय दिन पसाजरा होत असतो.


त्याचप्रमाणे यावर्षीही मंगळवार दिनांक २ फेब्रुवारी २०२१ रोजी चावनी (छावणी)येथे मोठ्या उत्साहात समरभूमी उंबरखिंडीत विजय दिन सोहळ्याचे आयोजन आले असून या विजय दिन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चावणी ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळासाहेब आखाडे यांनी केले आहे.