चावसर परिसरात घरफोडी केलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने 12 तासातच ठोकल्या बेडया !

0
104

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे केवरे,चावसर येथील घरफोडी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासात लोणावळा सोनार गल्ली येथून सापळा रचून मोठया शिताफिने ताब्यात घेतले आहे.तानाजी बबन दळवी (रा. केवरे, ता. मावळ, जि. पुणे ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार चावसर येथील केवरे गावातील एका राहत्या घराचे कोणीतरी अज्ञात चोरट्याने कुलुप तोडुन घरातील किचनमधील लोखंडी कपाटातील लॉकरमधील तब्बल सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 1 लाख 74 हजाराचा ऐवज घरफोडी चोरी करुन चोरुन नेल्याचा प्रकार दि.6 ते 7 दरम्यान उघडकीस आला होता.

त्याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तसेच लोणावळा भागात चोरीचे प्रमाण वाढल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व लोणावळा विभागातील एलसीबी चे पथक सदर समांतर तपास करीत असताना आज दि.12 रोजी लोणावळा येथे सोनार गल्लीत एक इसम आपले अस्तित्व लपवून स्वतःची अडचन आहे परंतु सोन्याची पावती जवळ नाही असा बहाना करून सोने विक्री करण्याच्या उद्देशाने दुकानदारांकडे चौकशी करत फिरत असल्याची माहिती गोपणीय सूत्रांकडून सहाय्यक फौजदार वाघमारे यांना मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेतले व त्याच्या कब्जात मिळालेल्या सोन्याचे दागिने कोठून आनले याबाबत त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने केवरे गावात गोणते यांच्या राहत्या घरी चोरी केली असल्याची कबुली दिली.


त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन चे गुन्हे अभिलेख तपासले असता सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात गु.र.नं.100/2022 भा.द.वी.क.454,457,380 प्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीला पुढील तपासा करीता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,अपर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप चौधरी,सहाय्यक फौजदार प्रकाश वाघमारे,सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण,पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवले यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे.