चिंचवाडी आदिवासी भागातील दुर्गादेवीचे माता उत्साहात विसर्जन….

0
183

(कर्जत प्रतिनिधी:गुरुनाथ नेमाने)

दि.26.कर्जत तालुक्यातील भिवपुरी नजीक असलेली चिंचवाडी आदिवासी भागातील नवरात्री उत्सवात दरवर्षीप्रमाणे प्रमाणे करत असतात पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या महामरीत मध्ये नवरात्र साध्य आणि सोप्या पद्धतीने साजरी केलेली आहे,शासनाच्या नियोजन पध्दतीने नवरात्र उत्सव नियमाची पालन करून करण्यात आली आहे.
यावेळी देवीच्या घटाची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नवरात्र नऊ दिवस साजरे केले जातात,तसेच आपल्या साध्य पद्धतीने कार्यक्रम करून मनोभावी पूजा अर्चा करून पूजन करून सेवा करणयात आली,त्याचप्रसंगी दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करणयात येते,
सदर दुर्गादेवीचे मातेचे विसर्जनाच्या काळात सर्व आदिवासी बांधवांनी नियमित पालन करून विसर्जन मिरणुक वाजत गाजत आणि पूजा अर्चा करून साध्य आणि सोप्या पद्धतीने करणयात आली,यावेळी सर्व नागरिक जयघोषात दुर्गा माते की जय!आंबा माते की,जय अस म्हणत महिला वर्ग व छोटे मोठे मुले आदीसह सर्व उपस्थिती होते.