Wednesday, May 29, 2024
Homeपुणेपिंपरी चिंचवडचिखली येथे भर दिवसा एकावर गोळया झाडून हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू..

चिखली येथे भर दिवसा एकावर गोळया झाडून हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू..

पिंपरी (प्रतिनिधी): चिखली गावात अज्ञात दुचाकी स्वरांकडून एकावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना दि.22 रोजी दुपारी 2:30 च्या सुमारास घडली.
सोन्या तापकीर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या भर दिवसा गोळ्या झाडल्या या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान सोन्या तापकीर याचा मृत्यू झाला आहे.गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
- Advertisment -

You cannot copy content of this page