Friday, February 23, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडचुकीच्या नोंदी सुधारून प्रॉपर्टी कार्ड लवकर द्या !

चुकीच्या नोंदी सुधारून प्रॉपर्टी कार्ड लवकर द्या !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये एक वर्षांपुर्वी कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाकडून ” ड्रोन ” द्वारे सर्व्हे झाला होता . त्यावेळी हालिवली गावामध्ये देखील सर्व्हे करण्यात आला , यानंतर तालुक्यातील इतर अनेक गावांतील ग्रामस्थांना त्यांच्या घराच्या क्षेत्रफळ व घरपट्टीनुसार प्रॉपर्टी कार्ड मिळाले , परंतु अद्यापी हालीवली गावातील ग्रामस्थांना कार्ड का मिळाले नाहीत , याबाबत चौकशी करण्यासाठी सरपंच सौ.प्रमिला बोराडे व मा.विभाग प्रमुख सुरेश बोराडे कर्जत येथील भुमी अभिलेख कार्यालयात पोहचले , त्यावेळी वारंवार जाऊन चौकशी केली असता असे लक्षात आले की , गावातील काही घर नंबर व त्यांच्या घरमालकांच्या नावाबाबतीत खुप तफावत आढळून येत आहे .या चुकीच्या नोंदी सुधारून ताबडतोब आम्हाला सुधारित प्रॉपर्टी कार्ड मिळाले , अशी मागणी हालीवली थेट सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक नितीन अटोळे यांच्याकडे केली आहे.

एक वर्ष सर्व्हे होवूनही प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास विलंब होत असल्याने कार्यतत्पर हालीवली सरपंच सौ . प्रमिला सुरेश बोराडे यांनी याबाबतीत कार्यालयात चौकशी केली असता , काही तांत्रिक बाबींमुळे घरपट्टी एकाची तर घर दुसऱ्याचे अशा नोंदी झालेल्या समोर आले . अशा चुकीच्या झालेल्या नोंदी सरपंच यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षक नितीन अटोळे यांच्या लक्षात आणून देत सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांनी लवकरात लवकर यातील त्रुटी दुर करून दुरूस्ती करण्यात यावी , तसेच हालिवली ग्रामस्थांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे , अशी मागणी केली.

तर सर्वांना सहकार्य करण्याची भुमिका घेवून पुढील आठवड्यात गावात येऊन प्रत्यक्ष हरकतीची सुनावणी करू , व नोंदी सुधारित करून प्रॉपर्टी कार्ड लवकरच देवू , असे आश्वासन उप अधिक्षक नितीन अटोळे यांनी दिले. तुम्ही वेळेवर चौकशीसाठी आले म्हणून बरे झाले , अन्यथा कायमस्वरूपी चुकीचे प्रॉपर्टी कार्ड हालीवली ग्रामस्थांना मिळाले असते , असे सांगण्यात आले .त्यामुळे हालीवली ग्रामस्थांनी सरपंच सौ. प्रमिला बोराडे व सुरेश बोराडे यांचे आभार व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page