Wednesday, September 27, 2023
Homeपुणेलोणावळाचैतन्य नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्यावतीने लोणावळा नगरपरिषदेला शुभेच्छा.....

चैतन्य नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्यावतीने लोणावळा नगरपरिषदेला शुभेच्छा…..

( मावळ प्रतिनिधी ) लोणावळा : चैतन्य नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला अभिनंदन पत्र देऊन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

लोणावळा नगरपरिषदेणे स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत तृतीय क्रमांक मिळविला असून हे लोणावळा नगरपरिषदेचे क्रमवार तिसरे नामांकन असून यासाठी नगरपरिषदेचे पदाधिकारी, सहकारी तसेच कर्मचारी यासर्वांनीच खूप मेहनत घेतली व लोणनावळेकरांचेही यात मनपूर्वक सहकार्य लाभल्यामुळे आज आपल्या शहराला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये तृतीय क्रमांक मिळाला असल्यामुळे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी हे अभिनंदन पत्र स्वीकारले असून त्यावेळी चैतन्य नागरी सहकारी मर्यादित पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण जोशी, उपाध्यक्ष कांताराम दळवी, सचिव जितेंद्र राऊत व संचालक मंडळ उपस्थित होते.यापुढेही आपल्या लोणावळा नगरपरिषदेणे स्वच्छ सर्वेक्षण मध्ये प्रथम क्रमांक मिळवावा अशा शुभेच्छा त्यावेळी देण्यात आल्या.

- Advertisment -