![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी) : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबियांबद्दल खालच्या भाषेत टीका करणाऱ्या जगदीश गायकवाड याच्या वक्तव्याचा लोणावळा शहर वंचित आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
मागील दोन दिवसांपूर्वी जगदीश गायकवाड यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा आज लोणावळा शहर वंचित आघाडी व भारतीय बौध्द महा सभेचे कार्यकर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा निषेध नोंदविला. तसेच जगदीश गायकवाड याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी असे निवेदन लोणावळा शहर पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, मावळ तालुका संपर्कप्रमुख भरत गुप्ते, प्रसिद्धी प्रमुख प्रवीण रोकडे, शहराध्यक्ष करण भालेराव, महासचिव अमन भाई शेख, उपाध्यक्ष वसीम खान, प्रवक्ते शेखर कदम, सहसचिव भरत कदम, संघटक रुपेश भाटकर, सचिव प्रमोद यादव, मिलिंद गुप्ते,विजय खरात,संजय कांबळे,विशाल कांबळे, जेष्ठ नेते आर डी जाधव,अंकुश चव्हाण आदींसह वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भारतीय बौद्ध महा सभेचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते.