Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व कर्जत तालुका सेवा समिती स्व.स्वरूप संप्रदायच्या वतीने...

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व कर्जत तालुका सेवा समिती स्व.स्वरूप संप्रदायच्या वतीने कर्जतमध्ये रक्तदान शिबिर संपन्न !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ध्येयाने पछाडलेला व्यक्ती आपले ध्येय गाठून त्यातून मिळणाऱ्या ” अनमोल साठ्याचा ” जगाला फायदा कसा होईल , हे स्वप्न उराशी बाळगून कार्य करत असतो , त्याचा प्रत्यय कर्जत तालुक्यात रक्तदाते राजाभाऊ कोठारी सर यांच्या ध्येयवेड्या ” रक्त संकलनातून ” दिसून येत आहे . हि मालिका आजपर्यंत सुरू ठेवून अनेकांना ” जीवनदान ” देण्याचे पुण्य त्यांच्या हातून घडत आहे . कर्जत – खालापूर तालुक्यातील ४८९ वे महारक्तदान शिबिर रविवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ४.३० वाजे पर्यंत उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आयोजित करण्यात आले होते.
” जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान व कर्जत तालुका सेवा समिती स्व.स्वरूप संप्रदाय ” च्या वतीने या रक्तदान शिबिरात एकूण ५५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक – राष्ट्रीय व मानवतावादी कार्य करून सहकार्य केले . विशेष म्हणजे यावेळी अनेक महिलांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन संप्रदायातील सर्व भक्तगणांनी माऊलीच्या नाम गजराने झाले. या प्रसंगी संप्रदायातील अनेक भक्तगण उपस्थित होते. या प्रसंगी रक्तसंकलानाचे काम डीकसळ येथील रायगड हॉस्पिटल रक्तकेंद्राचे डॉ. अलीशा हरपुडे , प्रीती लोंढे , भाविका पाटील , यशवंत ठाकूर , साहिल कदम , अर्चना डोईफोडे इत्यादी कर्मचाऱ्यांनी उत्तम पद्धतीने केले . या प्रसंगी आमिर मणियार , भूषण बाफना , साईनाथ श्रीखंडे व अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चंद्रकांत पाटील कर्जत तालुका अध्यक्ष , मोहिनी लोभी महिला तालुका अध्यक्ष ,रघुनाथ मराडे, ऊर्वि मेहता , विद्याधर गोळन जिल्हा जनगणना प्रमुख , मनीषा बडे , मेजर सर , अर्पिता सावळ , साईनाथ भोईर ब्लड इन नीड प्रमुख , कुंदा घूडे नेरळ शहर सेवा केंद्र अध्यक्ष, विद्या पानसरे , विजय लोभी , ऋतुजा पडळकर ,अनिल कडू , दिनेश बर्जे , हेमंत पवार , अशोक भाटकर व इतर अनेक भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतले . या सर्वांचे मनःपूर्वक आभार कर्जत तालुका सेवा समिती स्व. स्वरुप संप्रदाय व सार्वजनिक रक्तदाते तथा रायगड भूषण राजाभाऊ कोठारी सर यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page