Saturday, July 27, 2024
Homeपुणेकामशेतजण जाती समाज आदिम काळापासून ज्ञानी व संबंध जीवसृष्टीचा पालनहार - पद्मश्री...

जण जाती समाज आदिम काळापासून ज्ञानी व संबंध जीवसृष्टीचा पालनहार – पद्मश्री गिरीषकाका प्रभुणे…

कामशेत (प्रतिनिधी) : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अनुदानित आश्रमशाळा कामशेत येथे 13 वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव येथील प्रकल्प अधिकारी माननीय बळवंत गायकवाड, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य व शाळा समिती अध्यक्ष किरण बराटे, संस्थेचे उपसचिव प्रदीप वाजे, धनंजय वाडेकर, विक्रम बाफना, प्रकल्प कार्यालयाचे शरद काळे, मनोज शिंदे यांच्या हस्ते भारत माता, महर्षी अण्णा, बाया कर्वे व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तसेच आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचे साहित्य म्हणून त्याचे प्रदर्शन उभारले होते. त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री प्राप्त गिरीशकाका प्रभुणे यांनी केले.
यावेळी पद्मश्री गिरीषकाका प्रभुणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी जनजाती समाज अगदी आदिम काळापासून कसा ज्ञानी व संबंध जीवसृष्टीचा पालनहार आहे हे विविध दाखले देऊन सांगितले. जंगलात शांतपणे राहणारा हा समाजच गुरुकुल शिक्षण, विविध शोध, वैद्यकीय तसेच धातू विज्ञान, शस्त्रविद्या, खेळ, पौराणिक ऐतिहासिक ग्रंथ, समृद्ध भाषा, साधूसंत व क्रांतिकारी परंपरा तसेच स्त्रीउद्धारक विचाराचा उद्गाता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बदलत्या काळात या जनजाती समाजाला विविध आक्रमणांनी पार बदलून टाकले. त्यांना अज्ञानी, असंस्कारी, गुन्हेगार, मूर्ख ठरवलं गेलं पण वस्तुस्थिती अशी होती की आज जो समाज व स्त्री हिताचा प्रगत विचार आदिवासी समाजाने हजारो वर्षांपासूनच अवलंबला आहे. विविध जनजाती संस्कृती जपण्यासाठी स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा यांचा जागर करावा लागेल व हाच जनजाती समाज आपल्या राष्ट्राला परमवैभवावर पून्हा नेईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. त्यांनी महर्षी कर्वे अण्णांच्या कार्याचा गौरव केला तसेच उपस्थित पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांना आपल्या मनावर यश व समर्पित होऊन देव देश धर्म कार्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केले.
वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात सण 2022 – 23 मध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय माध्यमिकचे प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम पवार यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु. रवीना मोहिते, कु, अनुजा वाजे, प्रतीक्षा ठाकर, आरती मेंगळे, निकिता काळे यांनी केले.आभार प्रदर्शन शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्रीकांत बुरांडे यांनी केले. वंदे मातरम गायन घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page