Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडजनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले वाहतुकीच्या नियमांचे धडे..

जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना दिले वाहतुकीच्या नियमांचे धडे..


बोरघाट पोलीस केंद्राचा स्तुत्य उपक्रम..

खोपोली- दत्तात्रय शेडगे
सद्य सगळी कडे रस्ता सुरक्षा अभियान जोरात चालू असून बोरघाट पोलीस केंद्राच्या वतीने आज खोपोलित जनता विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे धडे देत नियमांचे महत्त्व पटवून दिले ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने बोरघाट महामार्ग केंद्र व जनता विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळीं शालेय विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा, व इतर वाहतुकीच्या नियामांची माहिती देऊन प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून वाहतूक नियमांचे परिपत्रक विद्यार्थ्यांना देण्यात आले
यावेळीं बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश परदेशी , पोलीस हवालदार, आणि जनता विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisment -