Monday, July 15, 2024
Homeपुणेलोणावळाजनधन खात्यातून 2000 रुपये लंपास ... खातेधारकांचा गैरसमज....

जनधन खात्यातून 2000 रुपये लंपास … खातेधारकांचा गैरसमज….

लोणावळा शहरातील” जनधन “खातेदारांची बँकांकडून फसवणूक होत असल्याची माहिती खातेदारांकडून “अष्ट दिशा” E news ला देण्यात आली.सदर जनधन खातेदारांच्या खात्यामधून 2000/रुपये कमी होत असल्याची तक्रार खाते धारकांकडून करण्यात आली त्याच संदर्भात अष्ट दिशा चे मावळ प्रतिनिधी ने बँक ऑफ महाराष्ट्र लोणावळा शाखेचे संचालक प्रतिम चंदन यांची भेट घेऊन “जनधन” खात्यासंबंधी विचारणा केली असता नागरिकांची कसलीही फसवणूक होत नाही, हा फक्त खातेदारांचा गैरसमज आहे असे सांगितले.

जनधन खाते हे शासकीय असल्यास त्याचा वापर शासकीय सुविधांसाठीच करता येऊ शकतो, खात्यामध्ये त्याव्यतिरिक्त रुपये जमा केल्यास ते कट होणार.हे खाते एका वर्षाकरिता मर्यादित असून फक्त दोन हजार रुपयांचे लिमिट धारकांना देण्यात आले आहे.जर कोणी जनधन खातेदार हे खाते वयक्तिक देवाणघेवाण करिता वापरत असल्यास त्याची माहिती आपल्या बँकेला देणे बंधनकारक आहे

. आपल्या बँकेत जाऊन आधार लिंक करून बँक संचालकांद्वारे आपल्या जनधन खात्याची मर्यादा वाढवून घेता येऊ शकते असे केल्यास तुमच्या खात्यामधील रुपये कट होणार नाही. सदर लिंक झालेल्या खातेदाराची माहिती शाखेच्या संगणकामध्ये नोंद करून लिमिट वाढवून घेता येईल आणि दोन हजार रुपये खात्यातून कट झाले अशी तक्रार असल्यास आपले खाते रिनेवल केल्यास ते रुपये पुन्हा खात्यात जमा केले जातील असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे शहरातील नगरपरिषद नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी 10,000/ रुपये कर्जाची तरतूद लोणावळा नगरपरिषद आणि शहरातील सर्व शासकीय बँकेमध्ये उपलब्ध आहे व त्यासाठी सरकारकडून सबसिडी ही मिळणार असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्र लोणावळा शाखेच्या संचालकांनी बोलताना सांगितले.

- Advertisment -

You cannot copy content of this page