लोणावळा दि.6: कोरोनाच्या पार्श्व् भूमीवर संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी युद्ध करत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन वेगवेगळ्या उपाय योजना राबवत आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार शासनाचे नियम डावलणाऱ्यांवर पोलीस प्रशासन कारवाई करत आहे. परंतु त्याची झळ जास्तीत जास्त सामान्य नागरिकांना बसत असल्याचे दिसत आहे.जेव्हा शासकीय अधिकारीच शासनाचे नियम तोडतात तेव्हा समाजात दुहेरी मेसेज पसरतात आणि हे आज लक्षात येत आहे.
लोणावळा शहर भाजपा च्या वतीने वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज दि.6 रोजी महिला क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्य लॉकडाऊनच्या उंबरठयावर असताना. ह्या स्पर्धेचे आयोजन याने शहरात भलतीच खळबळ निर्माण झाली आहे.
कारण लोणावळा नगरीच्या नगराध्यक्षा स्वतः ह्या स्पर्धेच्या आयोजक आहेत. आणि लोणावळा शहर भाजपा चे शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल हेही आयोजकांमध्ये असून ह्या राजकीय पुढाऱ्यांना शासनाचे नियम नाही का? अशा प्रश्नांना उधाण आले आहे. मग सामान्यांवर जशी कारवाई होते अशी ह्या पुढऱ्यांवर कारवाई होणार का? रात्री उशिरापर्यंत खेळले जाणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेवर कारवाई होणार का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.