Friday, June 14, 2024
Homeपुणेमावळजयश्री गाडे यांची देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड…

जयश्री गाडे यांची देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड…

कार्ला (प्रतिनिधी):देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री रोहिदास गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.नवनिर्वाचित सरपंच वंदना आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली देवले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची निवडणुक घेण्यात आली.
या उपसरपंच निवणुकीत जयश्री रोहिदास गाडे यांचा निर्धारीत वेळेत एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निरिक्षक संताजी जाधव व सरपंच आंबेकर यांनी गाडे यांची उपसरपंच पदाची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी सचिव म्हणून ग्रामसेविका ज्योती जळकोटे यांनी काम पाहिले. तर यावेळी नवनियुक्त सदस्य विकास दळवी, सदस्या सोनाली गायकवाड उपस्थीत होते.
जयश्री गाडे यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजे सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब आंबेकर, माजी पोलिस पाटील जेष्ठ नेते कान्हु आंबेकर, पोलीस पाटील राहुल आंबेकर, अनिल आंबेकर, रामचंद्र कोंडभर, संजय रोकडे, मारुती दळवी, चंद्रशेखर गायकवाड, दगडू गाडे, संदिप आंबेकर, सुभाष साठे, सागर ठोसर यांच्यासह देवले ग्रामस्थांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
- Advertisment -

You cannot copy content of this page