जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी मधुकर ढेबे..

0
129

खोपोली- दत्तात्रय शेडगे

जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी मधुकर ढेबे तर उपाध्यक्ष पदी सावळाराम कोकरे आणि सचिव पदी राजू आखाडे यांची निवड करण्यात आली.


धनगर समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही संघटना असून या संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन व सभा नुकतीच वासगाव( नागोठणे ) येथे पार पडली यावेळीं जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचा रायगड जिल्हाध्यक्ष पदी मधुकर ढेबे, उपाध्यक्ष पदी सावळाराम कोकरे, सचिव पदी राजू आखाडे, सहसचिव पदी संदीप ढेबे, खजिनदार पदी सुनील कोकळे, सहखजिनदार पदी सुभाष कोकरे , कार्याध्यक्ष पदी पांडुरंग आखाडे, सल्लागार पदी गंगाराम कोकळे, जयेश ढेबे, लक्ष्मण ढेबे, झिमा कोकरे, धाऊ केंडे, भाऊ केंडे, कायदेशीर सल्लागार पदी ऍड सुवर्णा कोकळे, सदस्य पदी पांडुरंग आखाडे, रामा झोरे, चंद्रकांत बावदाने, आवेश कोकळे, रामा तिवले, बाळू उघडे, लक्ष्मण गोरे, नथुराम मरगले, महेश झोरे, चंद्रकांत केंडे, भगवान बर्गे, मंगेश कोकळे, रामा ढेबे, राया ढेबे, यांची निवड करण्यात आली.


यावेळी धनगर समाजाचे जेष्ठ नेते अशोक जंगले, ऑल इंडिया धनगर धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख, महादेव कारंडे, जेष्ठ समाज सेवक देवजी कोकरे, विठ्ठल बोडेकर, माजी कार्याध्यक्ष झिमा कोकरे आदीसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते