Friday, October 18, 2024
Homeपुणेलोणावळाजश्न -ए -ईद -ए मिलादुन्नबी निमित्त नात- ए - रसुल व इस्लामिक...

जश्न -ए -ईद -ए मिलादुन्नबी निमित्त नात- ए – रसुल व इस्लामिक प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन…

लोणावळा:जश्ने-ऐ-ईद-ऐ- मिलादुन्नबी निमित्त स्माईल फाऊडेंशन लोणावळा तसेच सुन्नी मुस्लीम जमात, लोणावळा यांच्या देख रेखी खाली.नात-ए-रसुल व इस्लामिक प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन रविवार दि : 6 रोजी हजरत कासिम शाह वली दर्गा येथे करण्यात आले.
या स्पर्धा मध्ये तीन मुला मुलींची एकत्र (वय 1 ते 7) A गट,( 10ते 13)वर्ष B गट, व C गटात 15 ते 16 वर्षाखालील असे एकूण 215 स्पर्धक मिळून एकूण 16 टिम ने भाग घेतलेला होता. सर्व गटांमधून पहिले तीन तीन क्रमांक काढण्यात आले.त्यामध्ये प्रत्येकी 1 स्पर्धकाला 3 बक्षिस देण्यात आले. आणि बाकी सर्व 200 स्पर्धकांना “स्माईल फाऊंडेशन लोणावळा” यांच्या वतीने पहिल्या तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना रोख बक्षीस,सर्टिफिकेट, ट्राफी, व गोल्ड मेडल देण्यात आले. आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या इतर स्पर्धकांना सिलवर मेडल , गिफ्ट व सर्टिफिकेट देण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आदरणीय जिशान भाई हनीफ शेख हे होते. यांच्या वतीने विजयी स्पर्धकांना रोख बक्षीस रुपये 1000 प्रत्येकी देण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना सय्यद गौस पीर कादरी, मौलाना सय्यद मोहम्मद नदीम अशरफी, शाहिद सिद्धिकी, आसिफ सिद्धिकी व सुन्नी मुस्लिम जमात चेअरमन शफी अत्तार,व्हाईस चेअरमन रफीक शेख, काटेवाडी ट्रस्टी हाजी मुस्ताक, काटेवाडी व स्माईल फौंडेशन चे अध्यक्ष सद्दाम खान, उपाध्यक्ष तज्जमुल शेख, सचिव आझाद खान, खजिनदार ताहीर शेख सर,आदी मान्यवर होते.
तसेच कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी कार्यक्रम प्रमुख अशरफ हवारी, व्यवस्थापक शाहनवाज शेख,बॉईज इन्चार्ज ओवेस खान, मुली प्रभारी रिफत खान, नाश्ता प्रभारी गणेश ,कार्यकर्ते विशाल चौहान,आमीन शेख , सकलेन खान, कैफ शेख, रुखसार खान,आदिबा गडवाल,महेक शेख,मुस्कान शेख,निखत बेबल,इरम सिद्दीकी, छायाचित्रकार रोहित शिर्के, तंबू डेकोरेटर नूर मोहम्मद आदींनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सईद नल्लामांडू सर, रजामुराद खान सर यांनी केले तर कार्यक्रमाच्या समारोपावेळी सईद नल्लामांडू सर यांनी आभार प्रदर्शन केले. अगदी उत्सहात कार्यक्रम संपन्न झाला.
- Advertisment -

You cannot copy content of this page