जागतिक आदिवासी दिन कर्जत तालुक्यात उत्साहात साजरा !

0
230

आमची संस्कृती आमचा अभिमान,मी आदिवासी आमचा स्वाभिमान,याचे अनोखे दर्शन..

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)
कर्जत तालुक्यातील आदिवासी समन्वय समितीने ‘जागतिक आदिवासी दिन’ कर्जत तालुक्यातील मार्गाचीवाडी, पाथरज येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. ” आमची संस्कृती आमचा अभिमान ,आम्ही आदिवासी आमचा स्वाभिमान,” याचे अनोखे दर्शन यावेळी आदिवासी समाजाचे दिसले.यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमास कर्जत – खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेट थोरवे हे प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले होते.


आज ९ ऑगस्ट क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन असल्याने सर्व प्रथम क्रांतीकारी वीर महात्म्यांना नमन करून, मनमोहक आदिवासी पारंपरिक नृत्य पार पडले.यावेळी आदिवासी समाजाला त्यांच्या भविष्यातील घडामोडीसाठी व विकासासाठी आपण कसे कटिबद्ध आहोत याचे मार्गदर्शन आमदार महेंद्रशेट थोरवे यांनी केले आणि सर्व आदिवासी बांधवांना ‘ जागतिक आदिवासी’ दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


या प्रसंगी आदिवासी समन्वय समितीचे अध्यक्ष दत्तात्रेय हिंदोळा, कर्जत पंचायत समितीच्या नवनिर्वाचित उप सभापती सौ.जयवंती ताई हिंदोळा, समन्वय समितीचे उपाध्यक्ष बाळू बुरुड, सचिव विष्णू साबळे, सहसचिव सोमनाथ वाघमारे, सरपंच अंकुश घोडविंदे ,आणि सर्व आदिवासी समिती सदस्य , आदिवासी बांधव , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.