Sunday, September 24, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडजागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा खोपोली पालिकेच्या वतीने गौरव..

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा खोपोली पालिकेच्या वतीने गौरव..


खोपोली- दत्तात्रय शेडगे.


जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली नगरपालिका महिला व बालकल्याण समिती अंतर्गत संसाराचा गाडा चालविताना कुटुंबास आर्थिक स्थैर्य व मदत मिळावी म्हणून श्रम करून जगणाऱ्या स्वावलंबी महिलांचा सत्कार करित त्यांच्या कार्याचा गौरव 8 मार्च रोजी खोपोली नगरपालिका कार्यालय तळमजला येथे करण्यात आल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी गणेश शेट्टे, उपनगराध्यक्ष विनिता औटी, महिला व बालकल्याण समिती सभापती निकिता पवार, उपसभापती केविना गायकवाड, आरोग्य सभापती अर्चना पाटील, नगरसेविका निर्मला शेलार, सुनिता गायकवाड, अर्पणा मोरे, जिनी सँम्युअल, अलका शेंडे, प्रमिला सुर्वे, सारिका पिंगळे, वनिता काळे, मानसी काळोखे, वैशाली जाधव गटनेते सुनिल पाटील, नगरसेवक मोहन औसरमल आदीसह मोठ्या संख्येने नगरपालिका अधिकारी – पदाधिकारी व महिला वर्ग उपस्थित होत्या.

- Advertisment -