Sunday, September 24, 2023
Homeपुणेवडगावजिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वडगाव मधील नितेश चव्हाण याने पटकाविले ब्रॉन्झ पदक...

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वडगाव मधील नितेश चव्हाण याने पटकाविले ब्रॉन्झ पदक…

वडगाव : राज्यस्तरीय पुरूष बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत वडगाव शहरातील नितेश चव्हाण याने ब्राँझ पदक पटकावले.
मागील तीन दिवसांपूर्वी बुलढाणा येथील जिल्हा क्रिडा संकुल येथे राज्यस्तरीय पुरुष बाॅक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२१ संपन्न झाली.राज्यभरातून या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


या स्पर्धेत आपल्या मावळ तालुक्यातील वडगाव शहरातील कु. नितेश चव्हाण याने प्रतिनिधित्व करीत राज्यस्तरीय स्तरावर बाॅक्सिंग स्पर्धेत ब्राँझ पदक पटकावून वडगाव शहराची मान उंचावली आहे.कु. नितेश चव्हाण याने केलेल्या इच्छाशक्तीच्या जोरावर व सातत्यपूर्ण कामगिरी करून यशस्वी झुंजार खेळी केल्याबद्दल त्याचा वडगाव नगरपंचायत चे नगराध्यक्ष मयूर दादा ढोरे यांनी त्याचा स्वागत सत्कार करत शुभेच्छा दिल्या.


येणाऱ्या कालावधीत वडगाव शहरातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देऊन विशेष पाठबळ देण्याचा प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा यांनी दिले.

- Advertisment -