Wednesday, May 29, 2024
Homeपुणेकामशेतजि. प. उर्दू शाळा खडकाळे क्र.3 येथे शालेय "फूड फेस्टिवल 2023 "...

जि. प. उर्दू शाळा खडकाळे क्र.3 येथे शालेय “फूड फेस्टिवल 2023 ” संपन्न, विध्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

कामशेत (प्रतिनिधी): जिल्हा परिषद उर्दू शाळा खडकाळे क्र.3 येथे शालेय अंतर्गत फूड फेस्टिवल 2023 चे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील पाचवी ते आठवीतील विध्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तब्बल 35 विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. या फूड फेस्टिवल मध्ये पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने विध्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
सालाबादप्रमाणे यंदाही आज बुधवार दि.18 रोजी या फूड फेस्टिवल चे आयोजन शाळेकडून करण्यात आले. सदर फूड फेस्टिवल चे उदघाट्न कामशेत ग्रामपंचायत उपसरपंच सौ. विमल पडावकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. कविता काळे, सदस्या सौ. वैशाली इंगवले, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर काजळे यांच्या शुभहस्ते तर शब्बीर र. शेख,अमीन दा. शेख, सादिक तांबोळी, हबीब उल्लाह श. नदाफ, सईद नालमांडू आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या फूड फेस्टिवल साठी शाळेतील पाचवी ते आठवी च्या विध्यार्थ्यांनी प्रत्येकी पाच जणांचे एक स्टॉल असे तब्बल 35 प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करून विक्रीस ठेवण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने थंड पेय मध्ये काला खट्टा, पाईनॅप्पल ज्यूस, गुलाब ज्यूस, लिंबू शरबत, बनाना शेक आदींचा समावेश होता. तसेच खाद्य पदार्थांमध्ये गोड भात, गाजर हलवा, रगडा पॅटिस, तांदळाची करंजी, पावभाजी, भेळ पुरी, पाणी पुरी, स्वीट कॉर्न पकोडे, खट्टा आलू, चिकन कटलेट, चिकन रोल, व्हेज पकोडे, कांदा भजी, बिस्कीट चाट, चना मसाला, इडली चटणी, व्हेज मन्चुरिअन, पुरी भाजी आदींचा समावेश होता तर याबरोबर कटलेरी स्टॉल, डीशनरी स्टॉल, कलिंगड सॅलेट आदी चे स्टॉल विध्यार्थ्यांनी लावले होते.
या स्टॉल मधून कमी खर्चात ज्या विध्यर्थ्यांनी जास्तीत जास्त विक्री करून जास्त पैसे कमविले त्या विध्यार्थ्यांचे शाळेकडून विशेष कौतुक करून त्यांना पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक वर्गाकडून देण्यात आली. लहान व होतकरू विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अति उत्साह यावेळी पहायला मिळाला. तसेच पालक वर्गानेही प्रचंड गर्दी करून या फूड फेस्टिवल मध्ये विविध खाद्य पदार्थ खरेदी करत खाद्य पदार्थांचा अस्वाद घेतला.
मागील तीन वर्षानंतर आज पुन्हा सालाबादप्रमाणे फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यासाठी जि. प. उर्दू शाळेच्या शिक्षिका शेख नदिरा बानो, दामटे जन्नत शब्बीर, अत्तार रुबीना अशपाक, शेख मिनाज हमीद, सय्यद मुजक्कीर, सय्यद रबानी जीलानी, शहाबर्फीवाले सुमैया खा. आदी शिक्षक व शिक्षिकांनी तसेच विध्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
- Advertisment -

You cannot copy content of this page