Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडजीवाची पर्वा न करता विजेचे काम करणाऱ्या योध्यांना रेनकोट वाटप..

जीवाची पर्वा न करता विजेचे काम करणाऱ्या योध्यांना रेनकोट वाटप..

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जतमध्ये स्तुत्य उपक्रम..

(भिसेगाव-कर्जत/सुभाष सोनावणे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी तालुका उपाध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर आणि कर्जत नगर परिषदेचे माजी नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्या माध्यमातून तसेच रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कर्जत वीज कंपनीचे वायरमन आपल्या जीवाची पर्वा न करता विजेचे काम करून आपली सेवा बजावतात या योध्यांना पावसाळी रेनकोट वाटपाचा कार्यक्रम तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पक्षाच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करण्यात आले.


कर्जतमध्ये कोरोना संसर्ग काळ असूनही आजपर्यंत अहोरात्र आपल्या जीवाची – कुटुंबाची पर्वा न करता वीज कंपनीचे वायरमन आपले कर्तव्य बजावत असताना दिसत आहेत. त्यातच नैसर्गिक संकट येऊन जे चक्रीवादळ झाले त्यावेळी देखील कर्जत शहरातील सात ते आठ तर तालुक्यात जवळजवळ ३७ विजेचे खांब पडले असताना दिवसरात्र मेहनत करून वीज पुरावठा पूर्ववत करून कर्जतकरांना उजेडात ठेवले.

याकामी त्यांच्या मेहनतीची दखल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेऊन पावसात वीज पुरवठा खंडित झाल्यावर वीज कर्मचारी भिजत काम न करता सुरक्षित रहावे यासाठी रेनकोट देऊन त्यांच्या या सेवेला आधार देण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.


यावेळी कर्जत वीज कंपनीच्या उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील , माजी उपाध्यक्ष महेंद्रदादा निगुडकर , माजी नगरसेवक धनंजय दुर्गे , शहराध्यक्ष समीर चव्हाण, कर्जत न.प.चे नगरसेवक हेमंत ठाणगे , सचिव चिन्मय बडेकर, मनविसे तालुका उपाध्यक्ष सतीश कालेकर, मनविसे विभाग अध्यक्ष विनोद शेंडे, कळंब विभाग अध्यक्ष संजय पाटील, शहर उपाध्यक्ष मंगेश काणेकर, शहर उपाध्यक्ष प्रज्योत घोसाळकर, शहर उपाध्यक्ष रांकित शर्मा, शहर उपाध्यक्ष राजेश साळुंखे, महिला शहर उपाध्यक्ष आकांक्षा शर्मा, महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक सुधीर पालकर, संदेश काळभोर, नीलराज विचारे ,रुपेश मोरे , रुपेश जाधव ओमकार खाडे, हितेश ठोसर, मयुर दरेकर, आतिश दरेकर, कल्पेश दरेकर, सुरज दळवी , त्याचप्रमाणे इतर सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होतेे.


वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखून व वीज कंपनीच्या वायरमन यांना पावसाळ्यात रेनकोट रुपी कवचकुंडले मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भेट दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वत्र कौतुक होत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page